Home
* ज्ञानज्योत टॅलेंट सर्च परीक्षेसाठी नियम व अटी
* पालकांनी व शिक्षकांनी परिक्षेसंबंधी सर्व नियम,अटी काळजीपूर्वक वाचून फॉर्म भरावा.
* परीक्षा फॉर्म मधील सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी.
* एकदा भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही अथवा त्या ठिकाणी दुसरा विद्यार्थी बसवला जाणार नाही.
* परीक्षा केंद्र तालुक्याच्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी 200 पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असेल तेथे परीक्षा केंद्र दिले जाईल.
* परीक्षा केंद्र 200 विद्यार्थ्यांसाठी असेल.
* परीक्षा केंद्रावर आपल्या पाल्यास ने आण करण्याची जबाबदारी पालकांची राहील.
* डी. टी.एस. च्या अधिकृत समन्वयकाची ओळख पटवून परीक्षा फॉर्म व फी जमा करावी.
* परीक्षा कमिटीकडून प्रत्येक विद्यार्थ्याला सरावासाठी प्रश्नपत्रिका संच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात देण्यात येतील.
* परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर जर अचानक काही कार्यक्रम आयोजित केला असेल तर परीक्षा केंद्र दुसऱ्या सोईच्या ठिकाणी दिले जाईल. अशा वेळी पालक व शिक्षक यांनी सहकार्य करावे.
* सदर परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल.
* परीक्षा संपल्यानंतर संभाव्य उत्तरसूची https://www.dnyanjyot.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
* प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नाबाबत व उत्तर सूची बाबत आक्षेप असल्यास लेखी स्वरूपात कार्यालयाकडे पाठवावेत. त्यावर परीक्षा कमिटी निर्णय घेईल व नंतर अंतिम उत्तर सूची प्रसिद्ध करण्यात येईल.
* काही कारणास्तव परीक्षा घेण्यासाठी शाळा उपलब्ध झाली नाही तर परीक्षा कमिटी जी जागा देईल त्या ठिकाणी परीक्षा घेतली जाईल..
* परीक्षा केंद्रावर बेंचेस उपलब्ध नसल्यास परीक्षार्थीला खाली / जमिनीवर बसावे लागेल त्यासाठी विद्यार्थ्यांनी येताना पॅड सोबत घेऊन यावे.
* पारितोषिकांच्या संदर्भात सर्व निर्णय परीक्षा कमिटीकडे राखून ठेवण्यात आले आहेत.
* गुणवत्ता यादी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व केंद्रस्तरीय असेल.
* एकच नंबर वर एका पेक्षा जास्त विद्यार्थी असतील तर बक्षिसांची रक्कम विभागून दिली जाईल.
* परीक्षेची काठिण्य पातळी शालेय अभ्यासक्रमास पूरक असून यामुळे परीक्षार्थीवर कोणताही अतिरिक्त ताण पडणार नाही उलट त्याच्या गुणवत्तेत वाढ होईल याची मला पूर्ण खात्री आहे.
* परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेश पत्र 15 दिवस अगोदर संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल..
* परीक्षेचा निकाल https://www.dnyanjyot.in या संकेस्थळावर प्रसिद्ध केला जाईल.